
युवक काँग्रेस प्रवक्ता निवडीकरिता यंग इंडिया के बोल स्पर्धेचे आयोजन
युवक काँग्रेस प्रवक्ता निवडीकरिता यंग इंडिया के बोल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यातून विजयी होणाऱ्या स्पर्धकांना युवक काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके आणि युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी राष्ट्रीय प्रवक्ते संजय शुक्ला यांच्या उपस्थितीत दिली
ही स्पर्धा जिल्हा राज्य व राष्ट्रीय या तीन स्तरावर आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने गुगल फॉर्म जारी करण्यात आला आहे हा गुगल फॉर्म काँग्रेसच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर उपलब्ध असणार आहे तो गुगल फॉर्म भरून इच्छुक स्पर्धा आपला सहभाग नोंदवू शकणार आहे नाव नोंदविण्याची 1 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल
जे स्पर्धक गुगल फॉर्म च्या माध्यमातून नाव नोंदणी करतील त्यांची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हास्तरीय स्पर्धा होऊन त्यातील पाच विजेत्यांना राज्यस्तरावर संधी देण्यात येईल व राज्यस्तरावरील विजेत्यांना 14 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल
या स्पर्धेत 18 ते 35 वर्षे वयोगटातील सर्व नागरिक सहभागी होवू शकतील, काँग्रेसच्या चळवळीत प्रवक्ता म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले