नागपूर

पितृपक्ष पंधरवड्यात गौळाऊ गाईचेच दान करण्याचे गोरक्षण सभेचे आवाहन; वाचवलेल्या गाई दत्तक देणार

नागपूर( प्रतिनिधी )दिनांक 21 सप्टेंबर

विदर्भातील दुर्मीळ होत चाललेला गौळाऊ गोवंशाच्या संवर्धनासाठी येत्या पितृपक्ष पंधरवड्यात गौळाऊ गाईचेच दान करावे असे आवाहन गोरक्षण सभचे अध्यक्ष सतीश साल्पेकर व सचिव शिरीष भगत यांनी  केलेे.

गौळाऊ गाय ही विदर्भातील प्रजाती आहे. भरपूर दूध देणाऱ्या या गाईच्या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. ही प्रजाती हळूहळू नामशेष होत चालली आहे. संपूर्ण देेशात फक्त ७०० ते ८०० गौळाऊ गाई शिल्लक आहेत. एक गौळाऊ गाय २० हजार रूपयांपासून मिळते. या गाई गोरक्षणला दान केल्यास गोरक्षण त्यांची वंशवृद्धी करील अशी माहिती साल्पेकर यांनी दिली.

गाई दत्तक घेण्याचे आवाहन  

या शिवाय कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवलेल्या गाई दत्तक घेण्याचे आवाहन साल्पेकर यांनी केले. कत्तलखान्यात जाणाऱ्या गाई गोरक्षण सभेत मोठ्या संख्येने येत आहेत. एका गाईचा महिन्याचा खर्च साधारणत: २५०० ते ३००० हजार रूपये येतो. दानशूर व्यक्तींनी या गाई दत्तक घ्याव्या असे ते म्हणाले. शेतकऱ्याला दत्तक गाय त्याच्या शेतावरही नेता येईल. तर सामान्य माणूस ३, ६, ९ व १३ महिने असा आर्थिक भार उचलू शकतो, असे साल्पेकर म्हणाले. या शिवाय वाढदिवशी गोपूजनही येथे केले जाते.

येथे करा संपर्क

गौळाऊ गाय दान देण्यास तसेच कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवलेल्या गाई दत्तक घेण्यासाठी ईच्छुक दानदात्यांनी गोरक्षण सभेचे कार्यालय मंत्री प्रसन्ना पातुरकर यांच्याशी ९०२१९८४८४८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!