
प्रशासनातर्फे सावधानतेचा इशारा
सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील धरणे बऱ्यापैकी भरलेली असून *भारतीय हवामान खाते (IMD) विभागाने पुढील २ दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी ची शक्यता वर्तवली आहे*.
नागपूर जिल्ह्यातील मोठे धरणे (गेट असलेले) खालील प्रमाणे भरलेले आहेत :
(दिनांक २०.०९.२०१)
तोतलाडोह (रामटेक) – ८६%
नवेगाव खैरी (पारशिवानी) – ७९%
*वडगाव धरण (उमरेड) – ९४%*
नांद धरण (उमरेड) – ७६%
तसेच मध्यम प्रकल्प खालील प्रमाणे भरेलेले आहेत:
वेणा , नागपूर : १००%
कान्होलीबारा, हिंगणा : १००%
पांढराबोडी, उमरेड : १००%
मकरधेाकडा ,उमरेड : ४६%
सायकी उमरेड : ९६%
चंद्रभागा, काटेाल : १००%
मेारधाम, कळमेश्वर : १००%
केसरनाला, कळमेश्वर : १००%
उमरी, सावनेर : १००%
कोलार, सावनेर : १००%
खेकरानाला, सावनेर : ९६%
जाम, काटोल : १००%
वरील प्रमाणे १००% भरलेल्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून अल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे..
धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस व आजू-बाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवकामुळे पुर परिस्थिती लक्षात घेता द्वारे असणारे मोठे धरणाचे वक्रव्दार (गेट) केव्हाही उघडण्यात येवू शकतात.व द्वारे नसणारे धरणातील पाणी साठा १०० % पेक्षा जास्त झाल्यावर नदि/ नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार आहे. करीता नदी काठावरील सर्व नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना व नदी पात्रातून आवागमण करणा-या सर्व संबंधितांनी स्वत:ची काळजी बाळगावी.
*नागरिकांनी घ्यावयाची काळजी*
🛑कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका
🛑 नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा
🛑 मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.
🛑 जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका.
🛑 नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
🛑 अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका
🛑 धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर*
0712-2562668
टोल फ्री क्र 1077