ग्रामीण

जि प सदस्य दिनेश बंग यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

हिंगणा (तालुका प्रतिनिधी)

सततच्या पावसामुळे हिंगणा तालुक्यातील शेतमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी संकटात आला. हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रायपूर जिल्हा परिषद सर्कल मधील खैरी (पन्नासे), किन्ही (धानोली), मांगली, मोहगाव, मांडवघोराड, आदी गावांतील नुकसानग्रस्त शेतीची कृषी अधिकार्‍यांसमवेत जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्त भागाचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनास पाठवावे अशा सूचना उपस्थित कृषी अधिकारी यांना केल्या. सततच्या पावसामुळे सोयाबीन,कापूस , संत्रा,फुल शेती, फळबाग,व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याकरिता शासन दरबारी पाठपुरवठा करू असे दिनेश बंग बोलताना म्हणाले.

यावेळी प.स. सदस्य सुनील बोंदाडे, तालुका कृषी अधिकारी रामू धनविजय, मंडळ कृषी अधिकारी जगदीश नेरवाल, कृषी सहाय्यक वर्षा काळे, कृषी सहाय्यक सोनाली मस्के, शेतकरी उमेश पन्नासे, गोकुळदास मिनियार, गोविंदराव किनेकर, मनोज पन्नासे, अशोक इटनकर, प्रमोद पन्नासे, प्रवीण पन्नासे, विठ्ठल वड, मनोहर राऊत, तीर्थराज मोरे, राकेश तिलपाले, प्रकाश निघोट, अरविंद भोले, प्रफुल भोले, पोमेश रहांगडाले, आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!