पश्चिम विदर्भ

जिल्हा बँकेची तब्बल ३.३९ कोटींची फसवणूक, २ माजी अध्यक्षांना ईडीचे समन्स

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावत तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे तर ४ ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत असताना या ईडीच्या नोटीसने काँग्रेस पक्षाला झटका लागला आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३.३९ कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवत असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल मागवीले होते.

अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलालीपोटी ३.३९ कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असतांना दलाली देने बंधनकारक नव्हते. त्यामुळे बँकेची ३.३९ कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी १५ जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!