
पश्चिम विदर्भ
सेल्फीचा छंद जीवावर; पाय घसरल्याने इसम वाहून गेला!
अप्पर वर्धा धरण परिसरात कुटुंबासमवेत पर्यटनासाठी गेलेल्या एका इसमाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून वर्धा नदीच्या पात्रात पडून हा इसम वाहून गेला होता.
परिसरातील पर्यटकांनी दरवाजे उघडल्याने अप्पर वर्धा धरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे चांदुरबाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील कुटुंब धरण बघण्यासाठी आलं होतं.
धरण बघण्याचा आनंद लुटत असताना वर्धेकडे जाणाऱ्या पुलावरून फोटो घेत असताना प्रफुल्ल अशोक वाकोडे वय (४०) हा युवक नदीपात्रात पडून वाहत गेला. या युवकासोबत तीन महिला व चार-पाच मुले असल्याचे समजते. या घटनेची माहिती तहसील कार्यालयाला मिळताच त्यांनी तात्काळ जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन शोध पथकाला याठिकाणी पाचारण करण्यात आले.