
नागपूरात मंगळवारी महिलांसाठी विशेष लसीकरण
शहर व जिल्ह्यातील महिलांनी लसीकरण करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*
नागपूर दिनांक 17.. कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे नागपूर शहरात व जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला असून मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण करून घेत आहेत, लसीकरणा मध्ये महिला मागे राहू नयेत यासाठी मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी *महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम* राबविण्यात येणार आहे .ही मोहीम शहर व जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर राबविण्यात येणार आहे .
नारीशक्ती सुद्धा लसीकरणात मागे राहू नये या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आव्हान विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा व जिल्हाधिकारी आर विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे .
महिलांसाठी विशेष विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात संदर्भात पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी सूचना केली होती त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात येत्या मंगळवारी महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.