नागपूर

विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सहसंचालक पदी सरिता मुऱ्हेकर

नागपूर, दि. 17 : अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रादेशिक विभागाच्या उपसंचालक  सरिता मुऱ्हेकर यांची पदोन्नतीने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सहसंचालक पदी नियुक्ती झाली आहे. श्रीमती मुऱ्हेकर यांनी आज सहसंचालक पदाचे सूत्रे स्वीकारली.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे श्रीमती सरिता मुऱ्हेकर यांना निरोप देण्यात आला. अर्थ व सांख्यिकी सहसंचालक कृष्णा फिरके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. यावेळी प्रभारी उपसंचालक श्रीमती रुपाली कुकडकर, संशोधन अधिकारी विवेक भुसारी, माहिती विभागाचे माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.

अर्थ व सांख्यिकी विभागासोबतच हातमाग संचालनालय, वर्धा व चंद्रपूर येथील जिल्हा सांख्यिकी अधिकारी तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळात विविध पदावर श्रीमती मुऱ्हेकर यांनी काम केले आहे. कार्यक्रमाचे संचालन संशोधन कार्य स्नेहलता बनकर यांनी केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!