
कोराडी येथे डेंगूने तरुणीचा मृत्यू
कोराडी: लोनखैरी गावात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून आज येथील अठरा वर्ष वयाची बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी सायली बंडू जामगडे हिचा डेंगू मुळे आज मृत्यू झाला दोन दिवसांपूर्वी तिची प्रकृती गंभीर झाल्याने प्रथम खासगी रुग्णालयात व नंतर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले काल रात्री प्रकृती आणखीच गंभीर झाल्याने कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयातून पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केले परंतु दुर्दैवाने तिची डेंगूची झुंज संपली सायली ही तेजस्विनी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी ची विद्यार्थिनी होती गुणवंत असल्याने सहाजिकच सायलीच्या मृत्यूची बातमी कळल्याने कोराडी व लोंनखैरी येथे शोककळा पसरली दुपारी बारा वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
यावेळी नातेवाईक गावकर यांसह तिच्या विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे डेंगू चे रुग्णांची संख्या वाढत आहे नऊ सप्टेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या निरीक्षणामध्ये या गावात 80 टक्के घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल राऊत यांनी दिली लोणखेरी येथील गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोंनखैरी येथे उपकेंद्र देण्यात आले आहे या ठिकाणी असणारे परिचारिका व सेवक मुख्यालय राहत नसल्याने ह्या उपकेंद्राला नेहमीच कुलूप असते असा आरोप उपसरपंच बोधिसत्व झोडापे यांनी केला