
नागपूर
मनपाचे “गणेश विसर्जन वाहन आपल्या दारी”
नागपूर, ता १५ : जलप्रदूषण थांबविण्यासाठी यावर्षी नागपूर महानगरपालिकेतर्फे श्री गणेश विसर्जनासाठी झोन निहाय फिरते वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी या संदर्भात निर्देश आरोग्य विभागाला निर्गमीत केले होते. मनपातर्फे यावर्षी तलावात श्री च्या मूर्तीचे विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे.
मूर्ती विसर्जनासाठी सर्वच तलावांवर पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच झोन निहाय फिरते विसर्जन वाहनाची व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. भाविक आपल्या झोनमध्ये भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करुन वाहनांसाठी आपली माहिती देऊ शकतात. विसर्जनाची वेळ झोनल कार्यालया कडून कळविण्यात येईल, असे नोडल अधिकारी डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी सांगितले.