
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
नागपूर, दि. १५ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज नागपूर विमानतळावर सकाळी १०.३० ला आगमन झाले. ते नागपूर येथे दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत.
आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार,जिल्हाधिकारी विमला आर., विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर परिक्षेत्र डॉ. शेअरींग डोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी,पोलीस अधीक्षक राकेश ओला, राजशिष्टाचार अधिकारी मीनल कळसकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या दोन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये बुधवारी सायंकाळी ४ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे संरक्षण विषयक अभ्यासक्रम केंद्राचे उदघाटन करणार आहेत.
दिवसभरात विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी ते घेणार असून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. उदया गुरूवारी सकाळी 11 वाजता ते विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.