
विशेष गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित,20 ऑक्टोबरपर्यंत माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करावे
नागपूर दि. 14 : माजी सैनिक ,माजी सैनिक विधवेच्या गुणवंत पाल्यांकडून जिल्हा सैनिक कार्यालयाने विशेष गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. या पुरस्कांरासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त गुणवंत तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांना 25 हजार रूपये, विशेष गौरव पुरस्कार तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना ही सन्मानित करण्यात येणार आहे.
आपत्तीच्या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरूपाच्या लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, विधवा पत्नी, पाल्यांना राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार रूपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजाराचा पुरस्कार सैनिक कल्याण विभागाव्दारे प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यालयांचे गुणपत्रक टक्केवारीसह जोडावे. त्यासाठी अर्जाचा नमुना व माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. तरी याबाबतचे अर्ज 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.