नागपूर

महामेट्रो मध्ये 150 कोटींचा नोकर भरती घोटाळा, महीला अपंगाचे आरक्षणही नाकारले: प्रशांत पवार यांचा आरोप

महामेट्रो नागपूर मध्ये दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे, महामेट्रोने जाहिरात न काढताच ही नोकरभरती केली असून ओबीसी सोबतच महिला आणि अपंग यांना सुद्धा आरक्षण नाकारले असल्याचा दावा त्यांनी केला

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये 30 % आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे परंतु मेट्रोने महिलांसाठी असलेले 30% समांतर आरक्षण सुद्धा नाकारले आहे, महा मेट्रोने महिलांना संधी का नाकारली हा प्रश्न उभा ठाकत असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.याची गंभीर दखल महिला संघटनांनी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे.एवढेच नव्हे तर तो महिला नी तो हक्क प्राप्त करुनच घ्यायला पाहिजे असे ही त्यांनी सांगितले.

महामेट्रो मध्ये सर्वच नोकरी भरती अवैध

महामेट्रो मध्ये ओबीसी, एससी, एसटी ,ईडब्ल्यूएस, महिला अपंग या सर्वांचे आरक्षण नाकारले आहे यासोबतच सरकारी उपक्रमासाठी ठरवून दिलेली नोकरी भरतीची प्रक्रिया न करता सरसकट चेहरे पाहून नोकरी भरती करण्यात आली असल्याचा धक्कादायक आरोप पवार यांनी करतानाच सरकारी उपक्रमांमध्ये नोकर भरती करताना परीक्षा मुलाकात ग्रुप डिस्कशन मेडिकल टेस्ट व गेट परीक्षा इत्यादी निकष असतात परंतु महामेट्रोने फक्त मुलाखत घेऊनच नोकरी भरती केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे व दीडशे कोटीहून जास्त रुपयांचा घोटाळा झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे

महामेट्रोतर्फे या प्रकरणावर जे लोक स्पष्टीकरण देत आहे त्यांची नोकरी सुद्धा अवैध असल्याचा टोला प्रशांत पवार यांनी लगावला आहे.

महामेट्रोने पुन्हा नोकर भरती जाहीर करावी व सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यामध्ये भाग घेऊन आपली पात्रता सिद्ध करावी अशी मागणी आम्ही करीत असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले सोबतच या नोकर भरती मध्ये जे लोक दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावे असे त्यांनी नमूद केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!