
पूर्व विदर्भ
विदर्भातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान खात्याने (weather department) दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून यामुळे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावतीमध्ये सोमवारी तर गोंदियामध्ये मंगळवार, बुधवारी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथे सोमवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढू शकेल. गोंदियामध्ये बुधवारपर्यंत मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल. वर्धा, यवतमाळ येथेही सोमवारी पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तुरळक ठिकाणी पाणी साचू शकते तसेच कच्च्या रस्त्यांचेही नुकसान होऊ शकते