
राजपुत्र नाही तर या कारणामुळे अमित ठाकरे प्रचंड चर्चेत
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या कारणामुळे प्रचंड चर्चेत आले आहे
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे हादेखील मैदानात उतरला आहे. अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी अमित यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचा दौरा केला होता.
मात्र, या सगळ्यानंतरही अमित ठाकरे हे अद्याप किती साधेपणाने वागतात, हे दाखवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत राज ठाकरे यांच्याभोवती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा पडलेला दिसत आहे. मात्र, त्यावेळी अमित ठाकरे आपण राज ठाकरे यांचे पूत्र असल्याचा कोणताही बडेजाव न मिरवता गाडीपाशी शांतपणे उभे आहेत.
या फोटोतील अमित ठाकरे यांचा साधेपणा अनेकांना भावला आहे. एरवी अगदी लहानसहान नेता किंवा अगदी गावचा सरपंच म्हटला तरी त्याच्या कुटुंबीयांचा प्रचंड रुबाब असतो. मात्र, अमित ठाकरे यांच्यात असलेला साधेपणा हा अश्या लोकांना संदेश देणारा ठरणार आहे