
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनीचा मृत्यू , कारण ऐकून सर्वजण हळहळले
भंडारा/नागपूर : जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण वाढले आहेत. आतापर्यंत २० डेंग्यूच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर लाखनी तालुक्यातील रेंगेपार/ कोहळी येथील नागपूर अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षिय विद्यार्थीनीचा डेंग्यूने बळी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीक्षा सहारे असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आता आतापर्यत जिल्ह्यात डेंग्यूने पाच बळी घेतले आहे. सद्धा जिल्ह्यात ४२५ लोकांची तपासणी केली असून २० रुग्ण हे डेंग्यू पोझिटीव्ह निघाले आहे. यामुळे भंडारा जिल्हा प्रशासनाची डेंग्यू रोखण्यासाठी दमछाक होत असून आधी करोना आता डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे
भंडारा सोबत नागपूर येथे डेंग्यूचे थैमान वाढत असून यावर लवकरात लवकर प्रशासनाद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे