पूर्व विदर्भ

अखेर खासदार रामदास तडस यांचा मुलगा आणि पूजाचा विवाह

वर्धा प्रतिनिधी दि 7 सप्टेंबर : भाजप खासदार रामदास तडस यांची सून पूजा हिचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केला होता. त्यात तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर मारहाण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान, तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं

अखेर संध्याकाळी तडस यांचा मुलगा पंकज तडस यांनी  पूजाशी वैदिक पद्धतीनं विवाह केलाय. आपल्या घरीच अगदी साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडलाय. खासदार तडस यांची सून पूजा हिचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केला होता. त्यात तडस या(MP Ramdas Tadas’s son Pankaj and Pooja finally got married)

हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नसल्याचं म्हटलंय. त्यांनी आपली तक्रारही मागे घेतली आहे. सकाळी मी खूप पॅनिक झाले होते. सकाळी माझ्या गाडीसमोरुन कुणीतरी गेलं त्यावेळी मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण ती तक्रार केली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलिही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटलंय.

दरम्यान, खासदार रामदास तडस यांनी सांगितले की माझा मुलगा पंकज आणि पूजाचं लग्न झालं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघेही वर्ध्याला राहू लागले. काही काळानंतर पूजा माझ्या घरी राहायला आली. दरम्यानच्या काळात पंकज आणि पूजाचं भांडण झालं होतं. माझ्या वडिलांना न विचारता आपण लग्न केलंय. त्यावेळी आपलं असं ठरलं होतं की आपण वर्ध्याला रहायचं. मग आता तू त्यांना त्रास द्यायला त्यांच्याकडे का गेली, असं पंकजने पूजाला विचारलं.

ही भांडणं सुरु असताना मी वर्ध्याला होतो. मला घरुन फोन येताच मी तत्काळ पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी भांडणं सोडवली. मी देखील वर्ध्याहून घरी पोहोचलो. तोपर्यंत पंकज वर्ध्याला निघून गेला होता… त्यानंतर पूजा माझ्याजवळ 2 महिने राहिले. पण मी एकेदिवशी तिला सांगितलं की, अशी रुसून तू इथे किती दिवस राहणार आहे, तू पंकजकडे वर्ध्याला जायला हवं, असं आपण पूजाला सांगितल्याचं रामदास तडस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!