नागपूर

विनापरवानगी गणेश मूर्ती विक्रीची दुकाने हटविली

नागपूर महानगरपालिकेची रीतसर परवानगी न घेता फुटपाथवर गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटणाऱ्या नेहरूनगर व मंगळवारी झोनमधील दुकानदारांचे अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. ही कारवाई मंगळवारी (ता. ७) सायंकाळी करण्यात आली.

नेहरू नगर झोनअंतर्गत येणाऱ्या दिघोरी पुलाखाली अनेक विक्रेत्यांनी कुठलीही परवानगी न घेता दुकाने थाटली होती. याबाबत माहिती मिळताच मनपा आयुक्तांच्या आदेशान्वये नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार दिघोरी पुलाखालील सर्व दुकाने अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविली व रस्ता मोकळा केला.

दुसरी कारवाई मंगळवारी झोनमध्ये करण्यात आली. या झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये विनापरवानगी लावण्यात आलेल्या गणेश मूर्ती विक्रीच्या तीन दुकानांवर कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!