पूर्व विदर्भ

वर्धेत महिन्यातील प्रत्येक शनिवार कोरडा दिवस पाळावा: जिल्हाधिकारी देशभ्रतार 

डेंग्यु रुग्णाचे प्रमाण जास्त असलेल्या परिसरात       अधिका-यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्या       

डेंग्युच्या रुग्णांना ज्योतीबा फुले आरोग्य योजनेचा लाभ दयावा

वर्धा, दि 7 सप्टेंबर : जिल्हयात डेग्युच्या आजाराच्या रुग्णात मोठी वाढ होत असून सावंगी मेघे व सेवाग्राम येथे 300 डेंग्यु आजाराचे रुग्ण दाखल असून इतर खाजगी रुग्णालयात सुध्दा मोठया प्रमाणात रुग्ण दाखल होतांना दिसत आहे. सामान्य रुग्णालया दाखल होणा-या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरोसिस मशीन खरेदी करावी. ज्यामुळे रुग्णांना प्लेटलेट देण्याची सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांना चांगले उपचार देता येईल त्याच बरोबर खाजगीरित्या प्लेटलेट खरेदी करण्याची आवश्यक भासल्यास खरेदी करुन सदर महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत रुग्णांवर उपचार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी डेंग्यू आजार आढावा बैठकित दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी वेदप्रकाश पाठक,सेवाग्राम वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी  देवळीकर, आर्वी , हिंगणघाट, सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

नगर पालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्या परिसरात डेंग्यु आजाराचे रुग्णाचे प्रमाण जास्त आढळून येत आहे. अशा परिसराला नगर पालिका अधिकारी व नगर सेवकांनी स्वत: प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेबाबत पाहणी करुन लोंकामध्ये स्वच्छतेबाबत जागृती करावी. यासाठी सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयाकडून डेंग्यु आजाराच्या रुग्णाची पत्त्यासह यादी मागवून घ्यावी. सर्व नगर पालिका ग्रामपंचायत क्षेत्रात कोरडा दिवस पाळावा. त्याचबरोबर साचलेले गटार, नाल्या व घरामध्ये फवारणी करावी अशा, सूचना प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

नागपूर, गडचिरोली, गोदिंया व भंडारा जिल्हयात डेल्टाचे रुग्ण आढळले असून कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही त्यामुळे नगर पालिकांनी कोविडची चाचणी वाढवावी त्याचबरोबर नगर पालिकाच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर व गृहविलगीकरण कक्ष तयार करुन ठेवावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ऑक्सीजन पुरवठा , पर्याप्त प्रमाणात बेड उपलब्ध करुन ठेवावे. ऑक्सजीजन व व्हेंटीलेटरसहित बाल कोविड कक्ष तयार करुन ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!