पूर्व विदर्भ

वर्धेत बैल पोळा, तान्हा पोळा सामूहिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध 

शेतक-यांनी घरीच बैलांची पूजा करावी 

-जिल्हाधिकारी

वर्धा, दि 5 सप्टेंबर :- जिल्हयात पोळा व तान्हा पोळयाचा सण मोठया प्रमाणात साजरा होतो. मात्रा राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे जिल्ह्यात यावर्षी सुद्धा मारबतीची मिरणवणुक, तसेच तान्हा पोळा निमित्त होणा-या बैल सजावट स्पर्धा, मिरवणुका, शोभायात्रा, जत्रा यावर निबंध लावण्यात येत आहे. तथापी काही ठिकाणी मारबत व तान्हा पोळयाच्या दिवशी काही धार्मिक विधी असल्यास असा विधी जास्तीत जास्त पाच लोकांचे उपस्थितीत घरगुती स्वरुपातच साजरा करण्यात यावा. कोणत्याही गावात, शहरात बैलपोळा भरवण्यात येवू नये, शेतक-यांनी त्यांचे बैल सजवून घरीच पूजा करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्हयात पोळा, मारबत व तान्हा पोळा सण मोठया प्रमाणात व उत्साहात करण्यात येतो. 

६ सप्टेंबरला पोळा व ७ सप्टेंबरला मारबत व तान्हा पोळा हा सण साध्यापणाने साजरा करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच सदर सण साजरा करतांना सर्वानी मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझर किंवा हँन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता या कोविड त्रीसुत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. यावर्षी वर्धा जिल्हयातील कोणत्याही गावात/शहरात बैलपोळा भरवण्यात येवू नये,तथापी शेतक-यांनी त्यांचे बैल सजवून घरीच पुजा करावी. तसेच पोळा निमित्त गर्दी होणार नाही याची खबरदारी सर्व ग्रामपंचायत आणि नगरपालिका प्रशासनाने घ्यावी तसेच या बाबतची सुचना संबंधित ग्राम पंचायती, नगर पंचायती,नगर पालिका यांनी प्रसिद्ध करण्याची कार्यवाहीी करण्याचे सुद्धा आदेशात नमूद आहे.

जिल्हयात मारबत व तान्हा पोळयाचा सण मोठया प्रमाणात साजरा होतो. यावर्षी मारबतीची मिरणवणुक काढु नये तसेच तान्हा पोळा निमित्त होणा-या बैल सजावट स्पर्धा, मिरवणुका,

शोभायात्रा, जत्रा यावर निबंध लावण्यात आले आहे. तथापी काही ठिकाणी मारबत व तान्हा पोळयाच्या दिवशी काही धार्मिक विधी असल्यास असा विधी जास्तीत जास्त पाच लोकांचे उपस्थितीत घरगुती स्वरुपातच साजरा करण्यात यावा. धार्मिक परंपरा अंमलात आणण्यात येते अशा ठिकाणी कोविड-१९ संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे, आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येवुन कार्यक्रम घेण्यात यावेत असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!