नागपूर

पिवळी मारबत मिरवणूक निघणार नाही परंतु परंपरेनुसार होणार दहन संस्कार

जागनाथ बुधवारी नागपूर येथे नागोबा देवी देवस्थान तऱ्हाणे तेली समाजाच्या वतीने पिवळी मारबत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे 137 वे वर्ष असून दि. ७ सप्टेंबर रोजी मंगळवारला विसर्जनाचा कार्यक्रम करण्यात येईल. यामध्ये पिवळी मारबत स्वातंत्र्याच्या लढ्यात तऱ्हाणे तेली समाजाचा सिंहाचा वाटा असून देशात इंग्रजांचे जुलमी शासनाच्या विरोधात स्वतंत्र लढ्याने आंदोलनात विदर्भातील तऱ्हाणेतेली समाजाचा मोठा सहभाग होता. मारबतीचे पुरातन काळापासूनच स्वरूप म्हणजे मारबतीची पूर्वीच्या काळापासून तिची पूजा करतात. पोळ्यांच्या अमावस्याला मारबतीची मूर्ती स्थापन करुन त्या सोबत पळसाचे डहाळा ( मेंढे) घरोघरी दारात ठेवून पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी मारबतीची मूर्ती व पळसाच्या डहाळ्या पूर्ण घरात फिरून “रोगराई घेऊन जा गे मारबत ” म्हणत गावाबाहेर विसर्जन करतात. तसेच आपला देश हा कृषीप्रधान असल्याने शेतीच्या कार्यात बैलाचा फार मोठा सहभाग असल्याने पोळ्याच्या अमावस्येला बैलास सजवून घरोघरी पूजा केली जाते.

इंग्रज शासनाच्या अत्याचारास जनता कंटाळल्याने प्रत्येक धर्माचे, समाजाचे, प्रौढ युवा वर्ग देशातून इंग्रजास कसे हाकलावे या विचारात असायचे पण इंग्रजांची दडपशाही व अत्याचारी धोरणाच्या नितीमुळे एकत्रित रस्त्यावरून जनतेस जागृत करण्यास कायदेशीर बंदी होती. पण धार्मिक कार्यास थोडीफार मुभा होती. या संधीचा फायदा घेऊन तराने तेली समाजातील थोर रहिवासी यांनी आपल्या देशाला इंग्रज नावाची लागलेली रोगराई दूर करण्याकरिता समाजातील लोकांना एकत्रित करण्याचे व समाज बांधणीचे कार्य करून मारबत उत्सवाचे कार्य सुरू करून इंग्रजां विरुद्ध समाजाने लढा पुकारला. इंग्रजांच्या विरुद्ध लढा पुकारण्यात अहम भूमिका समाजाने मांडण्यात पुढाकार घेतला व इंग्रजां विरुद्ध लढा देणे हे फार कठीण होते. पण त्यात धार्मिक उद्देशाने एकत्रित करण्याकरिता थोडीशी कायद्यात मुभा होती या संधीचा फायदा घेऊन धार्मिक स्वरूप निर्माण करण्यास श्री भगवान कृष्णाची मावशी पुतणा राक्षसीने भगवान कृष्णाचा वध करायचा प्रयत्न केला होता. या शास्त्रोक्त घटनेचा आधार घेऊन मारबत उत्सवाची स्थापना पोळ्याच्या दिवशी सन 1885 पासून मारबत उत्सवाची स्थापना करून शुभारंभ करण्याचे फार मोठे कार्य समाजाने केले. तसेच पोळ्यानंतर गणपती बसवण्याची कार्य घरोघरी व्हायचे. स्वातंत्र्याचा लढा लढणारे थोर पुढारी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना सन 1893 मध्ये करून स्वातंत्र्य लढ्याच्या सिंहाचा वाटा दिला. अशाप्रकारे लढ्यात सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळण्यास फार मोठी भूमिका पार पाडली.

दरवर्षी मिरवणुकीचा मार्ग याप्रमाणे राहतील. पिवळी मारबत चौक, पाचपावलेश्वर शंकर मंदिर, गोळीबार चौक, भारतमाता चौक, नेहरू पुतला येथे काळ्या व पिवळ्या मारबतीचे मिलन होऊन मारवाडी चौक मिरची बाजार, अमरदीप सिनेमा, शहीद चौक ते गांधी पुतळा, बडकस चौक महाल, कोतवाली, गांधीद्वार, अग्रेसर चौक, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, तांडापेठ नाईकतलाव भूमी येथे दरवर्षी कार्यक्रम करण्यात येत होता. पण आता यावर्षी कोव्हीड -19 मुळे मिरवणूक निघणार नाही. पण आता यावर्षी कोरोनाचा पादुर्भाव असल्यामुळे जनता एकत्रित येऊ नये म्हणून हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पिवळ्या मारबतीचे नाईक तलाव येथे दहन संस्कार करण्याचे ठरवले आहे. याकरिता आम्ही शासनाकडे विनंती करण्यात आली आहे. शासनाच्या नियमाचा उल्लंघन न करता विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडण्यात येईल.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता  किशोर मालकर, मनोहर मोटघरे, देवानंद आंबागडे, धर्मेंद्र साठवणे, गजाननराव शेंडे, भास्कर तकीतकर, शुभम गबणे, नितीन खोपडे, भूषण खोपडे, स्वप्नील मोटघरे, अतुल भुते, प्रवीण समरीत, शुभम गौरकर, स्वप्नील भुते, पियुष देशमुख, अंकुश तकीतकर इत्यादी युवक कार्यकर्ते यांनी मूर्तीच्या कार्यास अहम भूमिका निभवली व कार्यक्रम यशस्वी केला. तऱ्हाणे तेली समाजाचे अध्यक्ष प्रकाश गौरकर, सचिव विजय खोपडे, कोषाध्यक्ष देविदास गभणे यांनी  ही माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!