नागपूर

फुकटचा भुट्टा खातात आणि हाकलून ही देतात, नितीन गडकरींची पोलिसांवर…..

नागपूर दिनांक 30 जुलाई ( शहर प्रतिनिधी )

‘मी बरेचदा व्हीएनआयटीजवळील रस्त्यालगतच्या हातठेल्यावर भुट्टा खायला जातो. तेव्हा तेथील ठेलेवाले सांगतात,’साहेब पोलिसांचा प्रचंड त्रास आहे. फुकटचा भुट्टा खातात आणि पैसेही देत नाहीत.’ ही स्थिती योग्य नाही.

गरीबांना जगण्याचा अधिकार आहे की नाही याचा प्रत्येकाने विचार करायला हवा,’ अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पोलिसांवर टीका केली. (union minister nitin gadkari criticizes polic perdonnel)

गडकरी म्हणाले,’शहरातील प्रत्येक एक लाख वस्तीच्या भागात स्वच्छ असे भाजीपाला आणि मटण मार्केट बनायला हवे. ही गोष्ट मी आजवर झालेल्या बहुतांश महापौरांना सांगून थकलो. पण, अद्याप यात पूर्णतः यश आलेले नाही. महापालिका, नासुप्रकडे अनेक जागा पडून आहेत. त्यावर अतिक्रमण होत आहे.

या जागांवर हातठेले विक्रेत्यांसाठी ओटे तयार करून त्यांना अधिकृतरित्या रोजगार द्यायला हवा. गरिबाला जात, पंथ, धर्म नसतो. त्याला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देण्याची गरज असते. त्याची अंमलबजावणी या योजनेतून व्हायला हवी.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!