
वडधामना येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
हिंगणा (तालुका प्रतिनिधि दि 3 सप्टेंबर)
हिंगणा तालुक्यातील वडधामना येथील भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये वडधामणाचे माजी सरपंच गंगाधरराव काचोरे, माजी उपसरपंच विद्यामन ग्रामपंचायत सदस्य मिलिंद काचोरे, ईश्वर भेंडे, लीलाधर मानमोडे, राजू भेंडे,अक्षय काचोरे, लक्ष्मण राऊत, माजी उपसरपंच लक्ष्मण सराटे, दिलीप भेंडे, फजित दमाहे, उमेश वाघाडे आदींसह अनेकांचा समावेश आहे, पक्षप्रवेश करणाऱ्यांची माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले. गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता बंग साहेबांच्या सोबत राहणे गरजेचे आहे याच विचाराने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अशा भावना प्रवेशितांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, राकापा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे,विजयराव पिसे, मुकेश पाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.