
कवठा(सोपीनाथ) ता.मुर्तिजापूर येथील यात्रेस बंदी
अकोला,दि.3– मौजे. कवठा(सोपीनाथ) ता. मुर्तिजापूर येथे दरवर्षी नागपंचमी व पोळा (दुसरा दिवशी) मोठ्या प्रमाणात भाविंकाची गर्दि होते. त्यामुळे आपती व्यवस्थापनअंतर्गत कलम 144 भंग होण्याची शक्यता लक्षात घेवून व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मौज कवठा सोपीनाथ येथे प्रतीबंधात्मक आदेश मुर्तिजापूरचे उपविभागीय दंडधिकारी यांनी निगर्मित केले आहे.
मौजे कवठा सोपीनाथ येथे दि. 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत येथील सोपीनाथ महाराज मंदिर परिसरात प्रवेश करण्यास तसेच या कालावधीत इतर कोणत्याही कार्यक्रमाचे, यात्रेचे आयोजन करण्यास, मिरवणुक काढण्यास याव्दारे मनाई करण्यात येत आहे. तसेच कवठा सोपीनाथ गावच्या सिमा बंद करुन पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन माना यांनी पुरेसा बंदोबस्त ठेवावा. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना लागु राहणार नाही, असे उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.