
गरोदर मातांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घ्यावा – जि प अध्यक्षा कालींदा पवार
यवतमाळ दि. 01 सप्टेंबर : ग्रामीण व आदिवासी भागात अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या काळात तसेच प्रसुती नंतर मजुरीचे काम करणे शक्य होत नाही व रोजगार बुडाल्याने माता व बाळ कुपोषीत राहण्याची शक्यता निर्माण होते. अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून शासनातर्फे प्रधानमंत्री मातृवंदन योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात पाच हजार रुपये लाभार्थी महिलेला देण्यात येतात. तरी गरोदर महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष न करता सकस आहार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार यांनी केले आहे.
आरोग्य विभागामार्फत गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताह दिनांक 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ यवतमाळ तालुक्यातील लासीना उपकेंद्रात जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांचे अध्यक्षतेत घेण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुषमा खोडवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.प्रिती दुधे, ज्योती दुधे-सरपंच ग्रा.पं.लासीना, वैद्यकीय अधिकारी डॉ.जया चव्हाण, पी.एम.व्ही.वाय.समन्वयक पोर्णीमा गजभिये उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी या सप्ताहानिमित्त जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचविण्याबाबत तसेच गरोदर माता व बालकांचे वेळेत नोंदणी करून त्यांना सर्व प्रकारचे लसीकरण व प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चातत सर्व लाभ द्यावे अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी भावी पिढी हे देशाचे भविष्य असल्याने त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणेबाबत सांगीतले.
प्रास्तावीकपर भाषणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण यांनी जिल्ह्यात चालू वर्षात चार हजार पाचशे अठरा गर्भवती महिलांना दोन कोटी एकसष्ठ लक्ष रूपयाची मदत तर योजना सुरू झाल्यापासून म्हणजे सन 2017 पासून जिल्ह्यातील एकुण सत्तावण हजार महिलांना चोवीस कोटी सदुसष्ठ लक्ष रूपयाचा लाभ त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.प्रगती कोपरकर यांनी व्यक्त केले.
गावातील लाभार्थी मयुरी बोरकर, निर्मला कासार, वैशाली शेंडे, मनिषा रामगडे, जयश्री दाभेकर, रेणु कांबळे, मंगला गेडाम, अंजली टाले यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.पायल गुल्हाने, छाया म्हस्के, सपना दोडेवार, दिक्षा अडकिने, दिपक तारगे, बी.एल.लांढे, एस.ठाकरे इ. उपस्थित होते.