
नागपूर मेट्रोत ओबीसींना डावलल्याचा आरोप,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनाचा इशारा
नागपूर: नागपूर मेट्रोमध्ये पदभरती करताना ओबीसी, एससी आणि एसटी उमेदवारांना डावलण्यात आलंय, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे. त्यामुळे मेट्रोतील या पदभरती घोटाळा प्रकरणावरून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघंही आक्रमक झालाय.ओबीसी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिलाय तर दुसरीकडे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी देखील आक्रमक भूमिका घेत यासंदर्भात मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे सांगितलेे‘
महामेट्रोनं पद भरती करताना ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय केलाय. मेट्रोनं मोठी चूक केलीय, त्यामुळं मेट्रो प्रशासनानं ही चूक दुरुस्त करावी, अन्यथा मेट्रो विरोधात आंदोलन करू’ असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिलाय.
नियम पाळले : नागपूर मेट्रो
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते प्रशांत पवार यांनी केलेल्या आरोपांवर नागपूर मेट्रोकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मेट्रोत पदभरती करताना आरक्षणाचे निकष पाळल्याचं नागपूर मेट्रोचे पीआरओ अखिलेश हळवे यांनी सांगितले.