
१५ ऑक्टोबरपर्यंत भोला गणेश चौक ते गजानन चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद
नागपूर, ता. ३१ : नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ता प्रकल्प टप्पा तीन अंतर्गत आझाद चौक ते लाकडी पूल व झेंडा चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारीपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी २५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर दरम्यान भोला गणेश चौक ते गजानन चौकापर्यंत उजव्या बाजूकडील वाहतूक पूर्णत: बंद राहील.
सदर आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहेत. या अनुषंगाने संबंधित कंत्राटदार व कार्यकारी अभियंता यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामच्या ठिकाणी काम सुरू केल्याचा व काम पूर्ण करण्याचा दिनांक नमूद करणे आवश्यक आहे. कंत्राटदाराने स्वत:चा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्र. असलेला फलक पर्यायी मार्गाच्या दोन्ही टोकांवर लावायचा आहे. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक सुरक्षा रक्षक व स्वयंसेवक नेमावयाचे आहेत. यासोबतच बांधकामादरम्यान अन्य सूचनांचे पालन करणे कंत्राटदाराला बंधनकारक राहील.