
नागपूर
गळा दाबून मुलीला ठार मारण्याचा वडिलांचा प्रयत्न
अतुल नरेंद्र अतकर वय ४३ हा अभियंता असून खासगी कंपनीत काम करायचा. २०१८ मध्ये त्याची नोकरी सुटली. तेव्हापासून तो बेरोजगार आहे. अतुल याला दोन मुली आहेत. कौटुंबीक कलहामुळे त्याची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली.
अतुलला दारूचे व्यसन जडले. रविवारी रात्री अतुल हा दारू पिऊन घरी आला. मुलीसह तो खोलीत झोपायला गेला. याचदरम्यान 12 वर्षीय मुलीने आरडाओरड केली.तेव्हा अतुलचे वडील नरेंद्र खोलीत गेले असता मुलगी उलट्या करीत होते नरेंद्र यांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर ती शुद्धीवर आली.
वडिलाने गळा आवळ्याचे तिने आजोबा नरेंद्र यांना सांगितले. नरेंद्र यांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी गुन्हा दाखल करून अतुल याला अटक केली