
ग्रामीण
मंदीर आणि धार्मिकस्थळे उघडा: बावनकुळे यांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन
भारतीय जनता पार्टी च्या वतीने धार्मिक स्थळे उघडण्यात यावी ह्यासाठी महाराष्ट्रभरात आंदोलन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात अनेक भाविक भक्त,महीला आणि कार्यकर्ते या शंखनाद आंदोलनात सहभागी झाले होते,राज्य सरकारने दारूची दुकाने आणि बार उघडण्यास परवानगी दिली मात्र मंदिर आणि धार्मिक स्थळे अजूनही बंदच आहे असा हल्लाबोल बावनकुळे यांनी राज्य सरकारवर यावेळी केला