
Breaking News
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे, त्यांना 31 ऑगस्टला कार्यालयात हजर राहण्याचे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात अटक केल्यानंतर आकसाने अनिल परब यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे आपल्या ट्विटमधून राऊत यांनी सूचित केले आहे. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.