
नागपूर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ची क्लीनचीट?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात CBI ने अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिल्याची माहिती मिळत असल्याची बातमी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे
CBI च्या प्राथमिक तपासात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याची माहिती मिळत असल्याचे या बातमीमध्ये म्हटले आहे. 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या CBI च्या 65 पानी अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचीट मिळाल्याची माहिती मिळते आहे. उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी हा अहवाल तयार केला आहे.
CBI च्या या क्लिनचिटमुळे आता ED ची कारवाई थांबते का ते पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ED ने अनिल देशमुख यांना याप्रकरणात आतापर्यंत 5 पाचवेळा समन्स बजावले आहे.