
नागपूर
ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567 सुरू
नागपूर दि. 27 : राज्यातील बेघर व अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567 सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाईनव्दारे ज्येष्ठ नागरिकांची सेवा व काळजी घेण्यात येईल.
या हेल्पलाईनसाठी जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी शेषराव नागमोती यांना नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य व जनसेवा फाऊंडेशन पुणे वतीने ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक विचार घडविणे, अत्याचारग्रस्त व्यक्तींची काळजी घेणे, असा असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.