Breaking News

महामेट्रो रेल्वे भरती मध्ये ओबीसी व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना डावलले : जय जवान जय किसान संघटनेचा आरोप

नागपूर प्रतिनिधि दि 23 ऑगस्ट : महामेट्रो रेल्वेच्या विविध पदांसाठी भरतीमध्ये अनियमितता असून यात ओबीसी व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (SC/ST/ EWS) उमेदवारांना डावलण्याचा मोठा आरोप जय जवान जय किसान संघटनेने केला आहे याशिवाय स्थानिकांनाही रोजगार न देतात परप्रांतीयांची भरती करण्यात आल्याचा आरोपही संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे

ओबीसी व मागासवर्गीय उमेदवारांना डावलले असतांनाही ओबीसी एससी एसटी संघटना शांत का आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला, या संघटनांनी 7 दिवसांत या गंभीर बाबीची दखल न घेतल्यास या सर्व संघटनांचा घेराव करण्याचाही मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला

महा मेट्रोमध्ये 2015 पासून आतापर्यंत सुमारे 881 पदासाठी नोकर भरतीची जाहिरात देण्यात आली असून यापैकी 42 एससी, 24 पद एसटी, 113 पद ओबीसी व बारा पद ईडब्ल्यूएस साठी राखीव होते मात्र या भरतीमध्ये आरक्षणाचा वाटा एससी 15 %, एसटी 7.5%, ओबीसी 27%, ईडब्ल्यूएस 10% असणे आवश्यक असल्याची माहिती प्रशांत पवार यांनी दिली

ओबीसी व इतर मागासवर्गीय लोकांचे प्रश्न उचलणारे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, बबनराव तायवाडे यांनी या भरतीतील अनियमिततेची तात्काळ दखल घ्यावी व ओबीसी व मागासवर्गीय उमेदवारांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन प्रशांत पवार यांनी यावेळी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!