
मनोरंजन
अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कॅन्सरची लागण
चित्रपट दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर Mahesh Manjrekar यांच्यावर मूत्राशयाच्या कर्करोगाची Bladder Cancer शस्त्रक्रिया झाली. जवळपास दहा दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महेश मांजरेकर हे घरी परतले असून त्यांची प्रकृती ठीक आहे.
महेश मांजरेकर यांनी ‘वाँटेड’, ‘जिंदा’, ‘रन’, ‘ओएमजी: ओह माय गॉड’ यांसोबत इतरही काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘वास्तव’, ‘कुरुक्षेत्र’, ‘विरुद्ध’ या हिंदी आणि ‘नटसमाट’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘मी शिवाजी पार्क’ या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोचंही सूत्रसंचालन केलं आहे.