
एकनाथ शिंदेच नारायण राणेला जोरदार प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला होता.
नारायण राणेंच्या यांच्या गौप्यस्फोटावर जोरदार प्रत्युत्तर देत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मला वाटतं त्यांनी हा शोध कुठून लावला मला माहिती नाही. माझ्या विभागात मला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझ्या विभागात मातोश्रीचा हस्तक्षेप आहे असं म्हणणं चुकीचं आहे. राणेसाहेब हे युती काळात मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना माहिती आहे की, धोरणात्मक किंवा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीने सामूहिकपणे घ्यावा लागतो. राणे केंद्रीय मंत्री आहेत, उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल किंवा पॉलिसी डिसिजन घ्यायचा असेल तर पंतप्रधानांच्या संमतीने घ्यावा लागेल.”
“नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य एकप्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अशाप्रकारे संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. राणेंनी केलेल्या वक्तव्यात कोणतेही तथ्य नाहीये” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.