
वर्धा महामार्गावर भरधाव ट्रक उलटला,क्लिनरचा मृत्यू ,चालक जखमी
हिगणा (ता १९):- डोंगरगाव शिवारात वर्धा मार्गावर आज सकाळी ९ च्या सुमारास भरधाव ट्रक अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला यात ट्रकखाली दबून क्लिनरचा जागीच मृत्यू तर चालक व एक प्रवासी जखमी झाले कृष्णा नात्थुसिंग राठोड (वय ३२) रा मुरैना (मध्यप्रदेश)असे मृतकाचे नाव असून चालक चंद्रपालसिंग तोमर व सचिन राठोड अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्र. आर जे११जी बी ४३०४ आनंतपुरम येथून टमाटर भरून ग्वाल्हेर ला जात असताना डोंगरगाव जवळ ट्रक समोर वाहन थांबल्याने तात्काळ थांबण्यासाठी ब्रेक मारले मात्र ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या बाजूला असलेल्या नालीत उलटला. यात क्लिनर कृष्णा पडुन ट्रकखाली टमाटर ने भरलेल्या ढिगाऱ्यात दबून त्याचा मृत्यू झाला. तर चालक तोमर ह्याला गँभीर दुखापत झाली .त्याला बुटीबोरी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.केबिनमध्ये बसलेला सचिन मधात असल्याने त्याला फक्त पायाला किरकोळ दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक कुथें, पोलीस कर्मचारी संजय तिवारी, सिद्धार्थ तांमगाडगे,ए एस आय यादव, अरुण इंगळे, गौरव पाटील घटनास्थळी पोहचले त्यांनी टोल प्लाझा हायवे पेट्रोलिंग टीमचे विनोद पाठक,दिलीप परमे,येतेंद्र भीमटे,असफाक अली,सिद्धार्थ नंदेश्वर,अश्फाक खान, उत्तम जीवने यांच्या मदतीने टमाटर च्या बॉक्स खाली दबलेला मृतदेह व जखमींना बाहेर काढले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी व जखमींना उपचाराकरिता नेण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. दरम्यान सहा पोलीस आयुक्त परशुराम परदेशी यांनीही घटनास्थळी भेट दिली.हिंगणा पोलिसांनी ट्रक ताब्यांत घेतला असून पुढील तपास सुरू आहे