
नागपूरात स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर पहिल्यांदाच आर्यलंडवरुन भारतात विमान आयात
नागपूर,दि. 19: देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहरात स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर पहिल्यांदाच आर्यलंडवरुन भारतात विमान आयात करण्यात आले. नागपूर येथून अनेक देशाचे विमान जातात परंतू लँडीग होत नव्हती. आता प्रथमच ही लँन्डींग झाली आहे. भारतात सात देखभाल व दुरुस्ती कार्यशाळा आहेत. त्यापैकी एक मिहान येथे सुरु होत आहे. यामुळे अनेक देशातील विमान येथे येतील त्यामुळे विदेश निधी प्राप्त होऊन रोजगार निर्मिती होईल व कुशल तांत्रिक मनुष्यबळ मिळेल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
मिहान सेझ येथील देखभाल दुरुस्ती कर्मशाळेत जेट सेट फ्लीट आयएफएससी युनिटद्वारे पहिल्या विमान आयात समारंभाचे उदघाटन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी विमला आर., आर. एम. ओ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी कनिका टिकरीवाल, एअर इंडियाचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर कारखानीस, आय. आर.एसचे मुख्य आयुक्त श्री. अशोक, मिहान सेझचे विकास आयुक्त व्ही. श्रमण, एम.आर.ओचे महाव्यवस्थापक सत्यविर व वरिष्ठ एअरकॉफ्ट अभियंता सुनील अरोरा यावेळी उपस्थित होते.
या कर्मशाळेत प्रशिक्षण देऊन कुशल तांत्रिक मनुष्यबळ निर्माण होईल. नागपूर शहराच्या विकासात भर पडणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. एअर क्रॉफ्टला मिहान सेझ, नागपूर येथे आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन शासनाची भरीव मदत झाली, त्यामुळेच हे शक्य झाले. मिहान सेझ येथे एअर क्रॉफ्टला परवानगी देण्यात आल्यामुळे विदर्भाला आर्थिक बळ मिळेल व रोजगार निर्मितीस मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले. विकास व तंत्रज्ञानाचे विविध कोर्सेस यामुळे येथे येतील. प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळ निर्माण होऊन औद्योगिक विकासास चालना मिळेल. प्रशिक्षित इंजिनिअर्स तयार होऊन त्यांना येथेच इंटर्नशिप करता येईल. ॲरनॉटिकल इंजिनिअर्ससाठी आता सुवर्ण संधी राहणार आहे, असे ते म्हणाले.
विभागीय आयुक्तांच्या वतीने एअर क्रॉफ्ट प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. तेथील प्रशिक्षित इंजिनिअर्सना येथे संधी मिळेल. त्यासोबत बी.एस.सी. ऐरोक्रॉफ्ट, बी.एस.सी. एव्हिऐशन सारख्या पदवी व डिप्लोमा अभासक्रम सुरु करण्यास वाव असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. 2015 मध्ये पहिला कार्गो विमान नागपूर एअर पोर्टवर आणणारा नागपूर येथील विमानचालक होता. आज येथे एअर कॉफ्ट देखभाल व दुरुस्ती कर्मशाळा झाली आहे. ही नागपूरकरांसाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी एअरक्रॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कनिका टिबरीवाल यांनी एअर क्रॉफ्ट विषयी विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमास एअर इंडिया व खाजगी विमान सेवेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
00000