
पश्चिम विदर्भ
दोन दिवसाच्या आढावा बैठकीचा वाशिम येथे समारोप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व सेलच्या वाशीम तालुक्याची आढावा बैठक संपन्न झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे पक्ष निरीक्षक डॉ.संजय रोडगे, विभागीय महिला निरीक्षक वर्षा निकम, महिला निरीक्षक मंदा देशमुख.यांच्या सह पदाधिकरी,कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती..
वाशिम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणखीन बळकट व्हावी या उद्देशाने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरू शकतो या मेळाव्यात प्रत्येक पदाधिकाऱ्याने आप आपल्या कामाचा आढावा सादर केला
यावेळी शेकडो तरूणांनी व तरुणींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला