
नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बवर खा.भावना गवळीचे स्पष्टीकरण
वाशिम (प्रतिनिधी) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल लिहिलेल्या पत्रामुळे सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
नितीन गडकरींच्या पत्रावर भावना गवळीचे स्पष्टीकरण
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी गडकरींची काही लोकांकडून दिशाभूल केली जात असल्याचं सांगत राष्ट्रीय महामार्गाचा विषय असल्याने त्यांची भेट घेऊन सगळ्या गोष्टी सांगणार असल्याचं मायभूमि न्यूज ला सांगितले “पुलाचं काम आहेत तर ते कोर्टात गेले आहेत. रस्ता चिरलेला आहे…काम खराब झालं आहे. अशा कामांची चौकशी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असं यावेळी त्यांनी म्हटलं
नितीन गडकरींच्या पत्रात काय लिहिले होते
वाशीम जिल्ह्यात महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक अडथळा आणून कंत्राटदारांना धमकावत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील महामार्गांच्या कामांसंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे. या पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन गृह विभागाकडून अहवाल मागवला आहे.