नागपूर

मोकळे भूखंड व बंद स्थितीतील मालमत्तेचे ३१ डिसेंबरपूर्वी कर भरा: नागपूर मनपा

नागपूर, ता. १३ : नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये ज्या मालमत्ताधारकांचे खुले भूखंड किंवा असलेल्या मालमत्तेचे मालमत्तांचे कर भरलेले नाहीत. अशा सर्व मालमत्ताधारकांनी संबंधित झोन कार्यालयातून मागणी देयक प्राप्त करून ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी आपले मालमत्ता कर भरावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

याशिवाय ज्या मालमत्ताधारकांना वर्षानूवर्षापासून मालमत्ता मागणी देयक प्राप्त झाले नाही किंवा मालमत्ता कर लागलेला नाही अशा नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील दुस-या माळ्यावर मालमत्ता कर विभागामध्ये आवश्यक दस्तावेजांसह संपर्क साधावा, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!