
पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ईमेल आयडी अपडेट करावे
नागपूर दि. 13 : पोलीस भरती -2019 साठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांची ई-मेल आयडी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू महा पोलीस डॉट जीओव्ही डॉट इन या संकेत स्थळावर जाऊन अद्ययावत करण्याचे अपर पोलीस महासंचालक, मुंबई यांनी कळवले आहे.
30 जुलै रोजीच्या पत्राव्दारे यासंबंधी उमेदवारांना त्यांच्या पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच पासवर्ड सर्वांनी बदलणे गरजेचे आहे. अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत त्यांचे आवेदनपत्र घडू शकणार नाही. तसेच एसईबीसी उमेदवारांना अराखीव खुला किंवा विकल्प देणे गरजेचे आहे. ईमेल आयडी विसरले किंवा अन्य कारणास्तव गहाळ झाल्याच्या तक्रारी काही उमेदवारांकडून या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट करण्यासाठी तसेच विकल्प देण्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
तरी उमेदवारांनी महापोलीस डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पोलीस कॉर्नर या विंडोवर बटन क्लिक करावे. पोलीस भरती 2019 मध्ये क्लिक करून घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा अथवा ईमेल आयडी व पासवर्ड बदल करून घ्यावा, असे संजयकुमार, अपर पोलीस महासंचालक, मुंबई यांनी कळविले आहे.
00000