नागपूर

कुख्यात गँगस्टर आबू खानची होणार ईडी चौकशी

अंमली पदार्थ्यांच्या तस्करीतील कुख्यात गुंड व मोक्काचा आरोपी आबू खान याला अलीकडेच पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यातून त्याच्या संपत्तीवर आता पोलिस विभागाने टाच आणण्यास सुरुवात केली आहे.

मात्र त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती व त्यातील पैशाची उलाढाल लक्षात घेता त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालयामार्फत करण्यात यावी, असा प्रस्ताव पोलिसांनी केंद्राकडे पाठविला आहे. (notorious gangster abu khan to face ed probe)

ताजबागसह शहरात दहशत असलेल्या आबू खान हा ‘एमडी किंग’ म्हणून ओळखला जात होता. गेल्या काही वर्षांपासून तो परिसरात एमडीसह गांजाची तस्करी, खंडणी वसूल करणे, जमिनीवर कब्जा करुन ती परस्पर विकणे, दुकाने भाड्याने देणे आणि वसूली करणे आदी अनेक धंदे करायचा. त्यातून त्याने बरीच संपत्ती जमविली होती. त्याने या माध्यमातून जमा केलेल्या संपत्तीचा आढावा घेत, त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

अनेकदा गुन्हे करुनही त्याच्या विरोधात कुणीही साक्ष देत नसल्याने आबू पोलिसांच्या हातून निसटायचा. त्याच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यामध्ये ३८ गुन्हे दाखल होते. त्यात चार खूनाचाही समावेश होता. त्यातूनच पोलिसांनी त्याच्यावर मोकाअतर्गत कारवाई केली होती. मात्र, तो फरार होता.

गेल्या सात महिन्यांपासून आबू खान हा पोलिसांना हुलकावणी देत होता. अलीकडेच पोलिसांनी त्याला भंडारा जिल्ह्यातून अटक केली. दरम्यान तपासात दररोज नवे खुलासे होत असल्याने आबू खान मोठी आसामी असून त्याचे अनेकांशी आर्थिक हितसंबंध असल्याने त्याची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) करण्याचा प्रस्ताव सहायक पोलिस आयुक्त पुंडलिक भटकर यांच्यामार्फत गेल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!