
रामधाम येथे महाशिवरात्री पर्यंत नागरिक बाबा अमरनाथ चे दर्शन घेऊ शकतील
रामधाम येथे श्रावण सोमवार निम्मित बाबा अमरनाथ मंदिराचे प्रवेशद्वार आले उघडण्यात!
श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात, घरात, हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. याच दिवसाचे औचित्य साधून
तीर्थ क्षेत्र रामधाम मनसर येथे श्रावण सोमवार निमित्त महा आरती करून ,
बाबा महाराज अमरानाथ यांचे कपाट द्वार, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते बर्फाने उघडण्यात आले. व पूजा अर्चना करण्यात आली.
श्रावण सोमवार च्या दिवशीपासून तर महाशिवरात्री पर्यंत कपाट द्वार सुरु असेल. व नागरिक बाबा अमरनाथ यांचे दर्शन घेऊ शकतील.
ही प्रथा मागील १० वर्षापासून सुरू असून , प्रत्येक वक्ती हा अमरनाथ येथे दर्शनाला नाही जाऊ शकत म्हणून , तीर्थक्षेत्र रामधाम येथे बाबा अमरनाथ यांचे मंदिर स्थापन करण्यात आले जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिक येथे दर्शनाला येऊ शकतील. असे पर्यटक मित्र व रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.
यावेळी पर्यटक मित्र व रामधाम चे संस्थापक चंद्रपाल चौकसे , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमचंद आमधरे,. सूर्यपाल चौकसे ,किसान नेता मिताराम सवालाखे, पि. टी रघुवंशी,,तुळशीराम कोठेकर, रामरतन गजभिये, शिवराम वरठी,, जयराम महाजन, श्रवण टेकाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.