
महाराष्ट्र
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe) यांचे निधन
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe) यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बालाजी तांबे यांच्यावर पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते पण आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालाजी तांबे यांनी योग, आयुर्वेद आणि संगीतोपचार याच्या बाबत महाराष्ट्रासह देशा-परदेशात काम केले आहे. लोणावळा जवळ कार्ले येथे त्यांनी ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ ची देखील स्थापना केली आहे. आजही तेथे आयुर्वेद उपचार केले जातात.
बालाजी तांबे यांनी ”गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले त्यानंतर इंग्रजी भाषेतही त्याचे अनुवाद झाले.
बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते त्यांच्याकडे उपचारांसाठी कार्ला ला आले होते.