
नागपूर
९ शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये मंगळवारी कोव्हॅक्सीन उपलब्ध
नागपूर, ता. ९ : नागपूर महानगरपालिका तसेच शासकीय केन्द्रावर मंगळवारी (१० ऑगस्ट) रोजी कोविशील्ड लस उपलब्ध राहणार नाही मात्र कोव्हॅक्सीनसाठी निर्धारित असलेल्या ९ केन्द्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहील.
कोव्हॅक्सीन उपलब्ध असलेल्या केन्द्रांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय पाचपावली, प्रगती हॉल दिघोरी आणि आयुष रुग्णालय सदर यांचा समावेश आहे. या सर्व केन्द्रांवर १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज नागरिकांना घेता येईल