
Breaking News
रेस्टोरेंट्स आणि मंदिर यांच्याबाबत उद्या निर्णय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रेस्टॉरंटचे वेळा वाढवून देणे आणि मंदिर उघडणे याबाबत उद्याच्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल अशी महत्त्वाची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना दिली
दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता 15 ऑगस्टपासून मुंबईत लोकल प्रवास करता येणार आहे. स्वातंत्र्य दिनापासून लोकल सुरु, पहिल्या टप्प्यात ज्यांनी दोन डोस घेतलेत आणि डोस घेतल्यानंतर ज्यांना 14 दिवस झाले आहेत. लोकल पाससाठी अॅपवर अर्ज करावा लागणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली