
महाराष्ट्र
चंद्रकांत पाटील उद्या राज ठाकरेंची भेट घेणार, युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या सकाळी साडेअकरा वाजता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर त्यांना भेटण्यासाठी जात असून राजकारणावर चर्चा होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली
राज ठाकरेंची परप्रांतीयांबाबतची भूमिका यासंदर्भात मी चर्चा करण्यासाठी त्यांना भेटणार आहे. सध्या युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, मी एकटा निर्णय करणारा नाही. आमच्याकडे तीन निर्णयकर्ते आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
आगामी नाशिक आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्यात चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.