पूर्व विदर्भ

पोलीस शिपाई भरती परीक्षा होणार ऑफलाईन ,अर्ज अद्ययावत करण्याचे आवाहन

भंडारा,दि.5:– पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई (गट-क) ची पदे भरण्यासाठी 3 सप्टेंबर 2019 रोजी व चालक पोलीस शिपाई (गट-क) ची पदे भरण्यासाठी 30 नोव्हेंबर 2019 रोजी महापरीक्षा पोर्टल यांचे मार्फत अर्ज मागविण्यात आले होते. पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई (गट-क) या पदांची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल, असे पोर्टलवर नमुद करण्यात आले होते. मात्र आता ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असून उमेदवारांच्या परीक्षा प्रवेशपत्रावर नमुद केलेल्या लेखी परीक्षा केंद्रावर नमूद दिनांकास उमेदवाराने लेखी परीक्षेसाठी हजर राहणे बंधनकारक असणार आहे.

महाराष्ट्र शासनाने 31 मे 2021 च्या शासन निर्णयान्वये एसईबीसी हे आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयान्वये एसईबीसी या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागा अराखीव (खुल्या) प्रवर्गात समाविष्ट करण्याचे नमुद आहे. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता दिलेले आरक्षण रद्द झाल्यामुळे ज्या उमेदवारांनी समाजिक व शैक्षणिक प्रवर्गाकरिता निश्चित केलेल्या आरक्षणाअंतर्गत आवेदनपत्र भरले होते. त्यांनी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज अद्ययावत करावा. संकेत स्थळावर याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विकल्प निवडावे.

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व अराखीव (खुल्या) चा विकल्प घेण्यासाठी पोलीस महासंचालक यांच्या www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पोलीस कॉर्नर या बटनावर क्लिक केल्यानंतर पोलीस भरती-2019 वर क्लिक करावे. त्यानंतर वेब लिंक वर क्लिक करुन उमेदवारांनी ज्या घटकासाठी आवेदनपत्र सादर करण्यात केलेले आहे त्या घटकासाठी युआरएल देण्यात आलेला आहे, त्यावर क्लिक करावे व सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी.

प्रत्येक उमेदवारांनी वर नमुद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन त्यांनी ज्या घटकांतर्गत आवेदन सादर केलेले आहेत त्या घटकांतर्गत निवड करुन उमेदवारांनी स्वत:चा पासवर्ड बदल करुन घ्यावा. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प निवडण्याची सुविधा 15 ऑगस्ट 2021 रोजी 24.00 वाजता पर्यंत उपलब्ध राहील. उमेदवारांनी आवेदन पत्रातील माहिती अद्ययावत करावी, असे प्रभारी पोलीस अधीक्षक भंडारा अनिकेत भारती यांनी कळविले आहे.

00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!