नागपूर

नागपूर : ८ शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये शुक्रवारी कोव्हॅक्सीन उपलब्ध 

नागपूर, ता. ५: नागपूर महानगरपालिका तसेच शासकीय केन्द्रावर शुक्रवारी (६ ऑगस्ट) रोजी कोविशील्ड लस उपलब्ध राहणार नाही मात्र कोव्हॅक्सीनसाठी निर्धारित असलेल्या ८ केन्द्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहील.

कोव्हॅक्सीन उपलब्ध असलेल्या केन्द्रांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, पाचपावली आणि आयुष रुग्णालय सदर यांचा समावेश आहे. या सर्व केन्द्रांवर १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज नागरिकांना घेता येईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!