
वर्धा: कोविशील्ड लसीचे 6 हजार तर कोव्हॅक्सीनचे 7 हजार डोस प्राप्त
उद्या 51 लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण
नऊ केंद्रावर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध
वर्धा, दि 5 ऑगस्ट :- जिल्ह्यात आतापर्यंत 5 लक्ष 18 हजार नागरिकांना कोविड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. शासनाकडून प्राप्त लसीचे डोसच्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून दुसरा डोस घेणा-यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कोविशील्ड लसीचे 6 हजार व कोव्हॅक्सीनचे 7 हजार डोस प्राप्त झाले असून उद्या 42 केंद्रावर 18 वर्षापुढील सर्व वयोगटासाठी लसीकरण सुरू राहील. तसेच कोव्हॅक्सीन लसीचे डोस नऊ केंद्रावर उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
18 वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांसाठी पहिला डोस तसेच 45 वयापेक्षा जास्त नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 76 लसीकरण केंद्रावर उपलब्ध राहील. तसेच कोव्हक्सीन लसीचे डोस पोलीस रुग्णालय, प्राथमिक आरोग्य उप केंद्र, वायगाव (निपानी), उपकेंद्र बोरगाव मेघे, उपकेंद्र सावंगी मेघे,राष्ट्रभाषा प्रचार समिती, रेल्वे रुग्णालय, गांधी लेप्रसी फांऊडेशन, टाका ग्राऊंड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र , हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय सेलु या नऊ केंद्रावर उपलब्ध आहे.